beed ps

बीड पंचायत समिती फोडली

क्राईम बीड राजकारण

बीड : येथील पंचायत समितीत गट विकास अधिकार्‍यांच्या कॅबीनमध्ये अज्ञात व्यक्तीने तोडफोड केल्याची घटना आज (दि.5) सायंकाळी घडली. कॅबीनमधील खुर्चा, काच फोडल्या असून संगणकाची तोडफोड करुन फेकून दिले आहे. या घटनेने पंचायत समिती परिसरात एकच खळबळ उडाली. ही तोडफोड कुणी केली, का केली हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. मात्र तोडफोडीच्या प्रकरणाने बीड पंचायत समिती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोनि.सुनिल बिर्ला यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.काळे, पोना.भागवत सानप, विष्णू चव्हाण यांनी पंचायत समितीमध्ये जावून पाहणी केली.

अज्ञातावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे-मिसाळ
अज्ञात तोडफोड करणार्‍या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही तोडफोड कशामुळे केली याचेही कारण समजलेले नसल्याचे गट विकास अधिकारी नारायण मिसाळ यांनी ‘कार्यारंभ लाईव्ह’शी बोलतांना सांगितले. 

Tagged