कोरोना अपडेट

मंत्री एकनाथ शिंदे कोरोना पॉझिटिव्ह

By Karyarambh Team

September 24, 2020

बीड : राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांची कोरोना चाचणी बुधवारी पॉझिटिव्ह आली आहे. ट्वीट करून स्वतः ही माहिती दिली आहे.

एकनाथ शिंदे यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, मी माझी कोरोनाची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोव्हीड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.