न्यूज ऑफ द डे

मास्क नाही तर प्रवेश, वस्तू व सेवा नाही!

By Karyarambh Team

September 26, 2020

echo adrotate_group(3);

मुंबई : माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेतंर्गत कोल्हापूर जिल्हाधिकारी दौलत देसाई ‘मास्क नाही प्रवेश नाही, मास्क नाही वस्तूही नाही, मास्क नाही सेवा नाही’ हा अभिनव उपक्रम राज्यभर राबवायला हवा, अशा शब्दात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनजागृती मोहिमेचा गौरव केला.echo adrotate_group(6);

   मुख्यमंत्री ठाकरे यांनी दृकश्राव्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मंत्री उपस्थित होते. कोल्हापूर येथून जिल्हाधिकारी दौलत देसाई आदी अधिकारी आदी उपस्थित होते. पुढे बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत जनतेचा सहभाग वाढवावा. ही मोहीम लोकचळवळ व्हावी. जिल्ह्यातील बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी विना मास्क खरेदी करु नये तसेच संबंधित दुकानदारानेही मास्क न लावल्यास त्याच्याकडूनही ग्राहकांनी खरेदी करु नये यासाठी ‘मास्क नाही प्रवेश नाही, मास्क नाही वस्तू नाही’ असे फलक दुकानदार दर्शनी बाजूस स्वत:हून लावत आहेत. त्याचबरोबर दुकानदाराने मास्क लावला नसेल तर ग्राहक त्याच्या दुकानात प्रवेश करणार नाहीत. अथवा वस्तू घेणार नाहीत या आवाहनालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. दुकानदारांने मास्क वापरला नसेल तर त्याचे दुकान आठ दिवसांसाठी सील करण्यात येत आहे.echo adrotate_group(5);

echo adrotate_group(9); echo adrotate_group(10);