बीड : बीड जिल्ह्यातून आज पाठविण्यात आलेल्या 53 स्वॅब पैकी दोन नमुने पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. तर 47 नमुने निगेटीव्ह आणि 4 नमुन्यांबाबत कोणताही निष्कर्ष काढता आलेला नाही, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिसन पवार यांनी दिली.
आंबेवडगावात आणखी दोन पॉझिटीव्ह
धारूर तालुक्यातील अंबेवडगावात काल पॉझिटीव्ह आढळून आलेल्या रुग्णाच्या घरातील 13 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील दोन पॉझिटीव्ह तर 2 स्वॅबचा निष्कर्ष निघालेला नाही, अशी माहिती धारूरचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सचिन शेकडे यांनी दिली. आजचे दोन्ही पॉझिटीव्ह हे मुंबईहून त्या रुग्णासोबतच आलेले होते.
महत्वाची सुचना: संबंधीत बातमीची लिंक व्हॉटसअॅप, फेसबूक व इतर सोशल प्लॅटफॉर्मवर फॉरवर्ड/शेअर केल्यास आम्हाला आनंदच आहे. परंतु ही बातमी आमच्या परवानगीशिवाय जशीच्या-तशी कॉपी करून ती टेक्स्ट स्वरूपात व्हॉटसअॅप ग्रुपवर, फेसबूकला पोस्ट करणे किंवा इतर वेबसाईटवर प्रकाशीत करणे, यातून कॉपीराईट कायद्याचा भंग होऊ शकतो. कार्यारंभकडून बातमी वेळोवेळी अपडेट केली जाते. त्याआधीच बातमीचा स्क्रीन शॉट काढून तो व्हायरल करून चुकीचा मेसेज बाहेर गेल्यास त्याची जबाबदारी कार्यारंभ घेत नाही.