राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍याची आत्महत्या

कोरोना अपडेट क्राईम न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा महाराष्ट्र

शासकिय रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरुन मारली उडी

पैठण : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ncp पदाधिकार्‍याने सरकारी रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि.27) सकाळी घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 
     काकासाहेब कणसे (वय 42 रा.धनगाव ता.पैठण) असे आत्महत्या suicide केलेल्याचे नाव आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आहेत. दि.21 सप्टेंबर रोजी काकासाहेब कणसे हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी सकाळी त्यांनी रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या केली. अशी माहिती रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर यांनी दिली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी आत्महत्या कशामुळे केली याची माहिती मिळू शकली नाही. कणसे हे राष्ट्रवादी काँग्रेस मनमिळावू पदाधिकारी असल्यामुळे पैठण तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.

Tagged