कोरोना अपडेट

राज्याचे मुख्य सचिव कोरोना पॉझिटिव्ह

By Karyarambh Team

September 28, 2020

मुंबई  : राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांचा सोमवारी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या मुख्य सचिव घरीच क्वारंटाईन आहेत.

मागील आठवड्यात मंगळवारी 22 सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला ते हजर होते. त्यामुळे प्रशासनाची सध्या चिंता वाढली आहे. यापूर्वी अनेक प्रधान सचिव आणि सचिव दर्जाच्या अधिकार्‍यानाही कोरोनाची लागण झाली होती. या पार्श्वभुमीवर मंत्रालयात आता विशेष काळजी घेतली जाण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी लक्षणे जाणवत असल्याने संजय कुमार यांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घेतली असता ते पॉझिटिव्ह आले आहेत.