पत्नीला बेदम मारहाण करणार्‍या आयपीएस अधिकार्‍याचे निलंबन

क्राईम देश विदेश न्यूज ऑफ द डे

भोपाळ : पोलीस अधिकारी असलेल्या पतीला एका महिलेच्या घरी ‘कारनामे’ करताना पत्नीनं रंगेहाथ पकडल्यानंतर टोकाचे वाद झाले. या भांडणात पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ मुलाने गृह मंत्र्यांनी पाठविताच संबंधित पोलीस अधिकार्‍याचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले. ही घटना हा मध्य प्रदेशात घडली आहे.

मध्य प्रदेशाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक पुरूषोत्तम शर्मा असे कारवाई झालेल्या पोलीस अधिकार्‍याचे नाव आहे. ते एका महिलेसोबत तिच्या घरी ‘कारनामे’ करताना दिसून आले. त्यांना रंगेहाथ पकडल्यानंतर पत्नीने त्याचा जाब विचारला असता, तिला पुरुषोत्तम शर्मा यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्या जखमी झाल्या. हा मारहाणीचा व्हिडीओ मुलगा पार्थ गौतम शर्मा याने केला होता. या घटनेचा व्हिडिओ गृहमंत्री, मुख्य सचिव यांना पाठवून वडिलांविरूद्ध कारवाई करावी अशी मागणी त्याने केली होती. त्यानंतर पुरुषोत्तम शर्मा यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात आले. या आदेशाची प्रत सरकारच्या गृह विभागानेही जारी केली आहे. या संपूर्ण प्रकरणात आयपीएस अधिकारी पुरुषोत्तम शर्मा म्हणाले, ही कौटुंबिक बाब आहे. स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांनी मारले. आपल्यावरील मारहाणीचा आरोपी त्यांनी स्वीकारला आणि सरकार कारवाई करेल ती मान्य असल्याचे सांगितले. तसेच, मी माझ्या पत्नीबरोबरच्या नात्यातून कंटाळलो आहे, असे देखील म्हटले.

Tagged