केज

केजचा रोहयो घोटाळा; तिघे बडतर्फ, दोघांचे निलंबन तर बीडीओंची चौकशी

By Karyarambh Team

September 28, 2020

echo adrotate_group(3);

केज : येथील पंचायत समितीअंतर्गत 13 कोटींच्या रोहयो घोटाळ्या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी पाच अधिकारी, कर्मचार्‍यांवर सोमवारी तडकाफडकी कारवाई केली आहे.echo adrotate_group(6);

कनिष्ठ सहाय्यक ए. एस. डांगे, विस्तार अधिकारी एम. बी. गायकवाड यांचे निलंबन तर सहाय्यक कार्यक्रम अधिकारी एस. यु. थोरात, सीडीओ एस.ए.बांगर व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी व्ही.सी.मुंडे ही सेवा समाप्ती केलेल्या कंत्राटी कर्मचार्‍यांची नावे आहेत. तालुक्यात रोहयो कामामध्ये गैरव्यवहार झाल्याची तक्रार प्राप्त होताच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) डी. बी. गिरी यांची चौकशी समिती नेमण्यात आली. चौकशीदरम्यान 22 जुलै आणि 25 ऑगस्ट या दोन वेळच्या भेटीत त्यांना कर्मचार्‍यांनी रोहयोचे कुठलेच रेकॉर्डच उपलब्ध करुन दिले नाही. असा अहवाल गिरी यांनी दिल्यावरून अजित कुंभार यांनी ही कारवाई केली आहे.echo adrotate_group(8); echo adrotate_group(10);echo adrotate_group(9);