न्यूज ऑफ द डे

आमदार निवासात बॉम्ब असल्याच्या निनावी कॉलमुळे मध्यरात्री खळबळ

By Karyarambh Team

September 29, 2020

मुंबई : मंत्रालयजवळ आकाशवाणी येथे आमदार निवास बॉम्बने उडवणार असा निनावी कॉल (दि.28 सप्टेंबर) रात्री आला होता. कॉल आल्यानंतर आमदार निवासमध्ये एकच खळबळ उडाली.

पाच मिनिटात आमदार निवास बॉम्बने उडवणार, असं निनावी कॉलमधील व्यक्तीने सांगितले होते. अशी माहिती सुरक्षारक्षकांनी स्थानिक पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी काही आमदारांसह रहिवाशांना तातडीने बाहेर काढले आणि श्वान पथकासह इमारतीमधील प्रत्येक रुमची तपासणी करण्यात आली. त्यासोबत आजूबाजूचा परिसरही तपासण्यात आला. पण या दरम्यान कोणतीही आक्षेपार्ह वस्तू सापडली नाही. सुदैवाने कुठलीही अप्रिय घटना घडली नाही. त्या निनावी कॉलचा पोलीस शोध घेत आहेत.