arrested criminal corona positive

चौसाळ्यातील कृषि दुकान फोडणारा चोरटा गजाआड

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

बीड , दि.29 : तालुक्यातील चौसाळा येथील एक कृषि दुकान अज्ञात चोरट्याने फोडले होते. या प्रकरणी नेकनूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास करत आरोपीला उस्मानाबाद येथून अटक केली आहे.
    आशोक दिलीप कळसकर (वय 30 रा.चौसाळा) असे आरोपीचे नाव आहे. त्याने रविवारी (दि.20) रात्री चौसाळा येथे कृषि दुकान फोडले होते. दुकानातील 2 लाख 70 हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली होती. या प्रकरणी खाडे यांच्या फिर्यादी नेकनूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही कारवाई पोलीस अधीक्षक आर.राजा, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भरत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि.गोविंद एकिलवादे, तुळशीराम जगताप, मुन्ना वाघ, श्रीमंत उबाळे, राहुल शिंदे यांनी त्यास उस्मानाबाद येथून ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपासकामी त्यास नेकनूर पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

Tagged