औरंगाबाद एसीबीची कारवाई
बीड दि.29 : एका पोलीस कर्मचार्यास लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.29) दुपारी करण्यात आली. गेवराई तालुक्यातील चकलंबा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी राठोड यास लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणी चकलंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.अनिता जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद येथील टिमने केली आहे. या कारवाईमुळे पोलीस दलामध्ये खळबळ उडाली आहे.