देश विदेश

मोठी बातमी! उपराष्ट्रपती कोरोना पॉझिटिव्ह

By Karyarambh Team

September 29, 2020

नवी दिल्ली : देशाचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांनी स्वतः ट्वीट करून ही माहिती दिली आहे.

सध्या त्यांची प्रकृती ठीक असून कुठलीही लक्षणे नाहीत. संसदेच्या अधिवेशनात त्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर ते कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.