क्राईम

बाबरी प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

By Karyarambh Team

September 30, 2020

बाबरी पाडण्याचा पूर्वनियोजित कट नव्हता-न्यायालय

लखनऊ : तब्बल 28 वर्षानंतर बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात विशेष न्यायालयात आज निर्णय सुनावला गेला. यावेळी या प्रकरणातील 32 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.        6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर फैजाबादमध्ये दोन एफआयआर दाखल करण्यात आल्या होत्या. यातील एक एफआयआर लाखो कारसेवकांविरोधात दाखल करण्यात आली होती तर दुसरी एफआयआर संघाच्या कार्यकर्त्यांसहीत लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, तत्कालीन शिवसेना नेते बाळ ठाकरे यांच्याविरोधात दाखल करण्यात आली होती. यावेळी न्यायालयात चंपत राय, जय भगवान, साध्वी ऋतंभरा, विनय कटियार यांच्यासहीत अनेक आरोपी न्यायालयात दाखल करण्यात आले होते. तसेच मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण आडवाणी आणि उमा भारती व्हिडिओ कॉन्फरनसिंगद्वारे सुनावणीला हजेरी लावली. या यप्रकरणामध्ये सर्वच आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस के यादव यांच्यासमोर पार पडली.