बीड जिल्ह्यात कोरोना 10 हजारांवर

न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यातील स्वॅब अहवाल आज बुधवारी दि.30 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजून 22 मिनिटांनी प्राप्त झाले आहेत. एकूण 1 हजार 214 पैकी 204 पॉझिटिव्ह अहवाल तर 1 हजार 10 निगेटिव्ह आले आहेत.

   बीड तालुक्यात 44, अंबाजोगाई 34, आष्टी 47, धारूर 6, गेवराई 11, केज 24, माजलगाव 11, परळी 14, पाटोदा 6, शिरूर 7 तर वडवणी तालुक्यातील 12 रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, त्यामुळे आता जिल्ह्यात कोरोनानाची एकूण रूग्णसंख्या 10 हजार 54 इतकी झाली आहे. तर मृत्यूसंख्या 272 इतकी आहे.

1
2
3
4
5
Tagged