accident

क्राईम

रिक्षा-बुलेटचा अपघात; एकाचा मृत्यू, पाच जखमी

By Keshav Kadam

October 06, 2020

सिरसदेवी परिसरातील घटना

बीड  : गेवराई तालुक्यातील सिरसदेवी परिसरामध्ये कल्याण-विशाखापट्टनम महामार्गावर रिक्षा-बुलेटचा अपघात झाला. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून पाचजण जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.        राहुल फरताळे (रा.बीड) यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. ते युवासेनेचे पदाधिकारी होते. त्यांच्या बुलेटचा (एमएच-23 एन-4042) आणि रिक्षाचा सिरसदेवी परिसरात कल्याण-विशाखापट्टनम महामार्गवर मंगळवारी (दि.6) 5.30 च्या सुमारास अपघात झाला. या अपघातामध्ये युवासेना पदाधिकारी राहुल फरताळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर रिक्षातील पाच जण जखमी असल्याची माहिती पोलीसांनी दिली. महामार्ग पोलीस सागर शेळके यांच्यासह आदींनी जखमींनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.