क्राईम

महामार्गावर लुटणारी टोळी गजाआड

By Keshav Kadam

October 06, 2020

echo adrotate_group(3);

एलसीबीची कारवाई : 34 मोबाईलसह दुचाकी जप्तecho adrotate_group(7);

बीड  : महामार्गावर नागरिकांना आडवून त्यांना लुटणारी टोळी मंगळवारी (दि.6) गजाआड करण्यात आली. त्यांच्याकडून 34 मोबाईलसह एक दुचाकी असा 3 लाख 88 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.      पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप मधुकर उबाळे (वय 42 रा.वसंतराव नाईक कॉलेज समोर, नांदेड) यांना अंमळनेर परिसरामध्ये ऐवज लंपास केला होता. तसेच बीड शहराचे बाहय भागात वॉकींगसाठी जाणारे एकांतातील लोकांना धाक दाखवून त्यांचे जवळील नगदी रुपये, मोबाईल व सोन्याचे दागिने अशा लुटमारीच्या घटना घडल्या होत्या, सदरचे गुन्हे अज्ञात आरोपी केले असल्याचे माहिती फिर्यादीकडून मिळाली होती. या अनुषंगाने पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा तपास करत होती. त्यांना श्रावण गणपत पवार व त्याचे दोन साथीदार रामा अमृतराव साळुंके व सय्यद जावेद सय्यद जाफर (सर्व रा.नवगण राजुरी ता.जि.बीड) यांना त्यांचेकडील होंडा शाईन( एमएच-12-एचजी-2403) व चोरोचे (34) मोबाईलसह ताब्यात घेतले. त्यांना अधिक विश्वासात घेवून विचारपुस करता त्यांनी सांगीतले की, आम्ही सर्वांनी पाच सहा दिवसांपूर्वी डोंगरकिन्ही ते चुंबळी जाणारे रोडवरील घाटात वाहने आडवून वाहनातील लोकांकडून चोरी केल्याचे सांगीतले. तसेच बीड शहराचे बाहय भागातील इतर ठिकाणी चोरी केल्याचे सांगीतले. त्यांचेकडून चोरीचे एकूण 34 मोबाईल, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा 3 लाख 88 हजारांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना पुढील तपासकामी पोलीस स्टेशन, अंमळनेर येथे हजर केले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखाचे पोनि.भारत राऊत, सायबर सेलचे पोनि.रविंद्र गायकवाड, सपोनि.आनंद कांगुणे, पोउपनि.गोविंद एकिलवादे, पोह. तुळशीराम जगताप, शेख सलीम, बालाजी दराडे, रविंद्र गोले, श्रीमंत उबाळे, मनोज वाघ, विकास बाघमारे, राहुल शिंदे, प्रसाद कदम, कैलास ठोंबरे, अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, युनूस बागवान, सखाराम पवार, नरेंद्र बांगर, विक्की सुरवसे, चालक अतुल हराळे, संतोष हारके यांनी केली.echo adrotate_group(5);echo adrotate_group(1);echo adrotate_group(9);