क्राईम

सीबीआयच्या माजी संचालकाने घेतला गळफास

By Karyarambh Team

October 07, 2020

दिल्ली :  सीबीआयचे माजी संचालक मणिपूर नागालँडचे माजी गव्हर्नर अश्वनी कुमार यांनी आत्महत्या केली आहे. त्यांचा मृतदेह शिमला येथील त्यांच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला आहे. शिमल्याचे पोलीस अधीक्षक मोहित चावला यांनी या संदर्भात माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून अश्वनी कुमार हे नैराश्याच्या गर्तेत होते. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि डॉक्टरांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधिकार्‍यांसाठी ते एक आदर्श होते. त्यांचा मृत्यू अशाप्रकारे होणं ही अत्यंत दुःखद घटना आहे अशी प्रतिक्रिया मोहित चावला यांनी दिली आहे. अश्वनी कुमार हे ऑगस्ट 2006 ते 2008 या कालावधीत हिमाचल प्रदेशचे डिजीपी होते. त्यानंतर त्यांना सीबीआयचे संचालक पद देण्यात आले. ऑगस्ट 2008 ते 2010 पर्यंत ते या पदावर होते.