क्राईम

पाच हजारांची लाच घेताना रेशीम कार्यालयाचा क्षेत्र सहाय्यक पकडला

By Karyarambh Team

October 11, 2020

echo adrotate_group(3);

बीड : येथील जिल्हा रेशीम कार्यालयात लाभार्थ्यांकडून लूट होत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. अखेर लाचखोरीच्या गैरप्रकारांवर आज शिक्कामोर्तब झाले आहेत. या कार्यालयाचा क्षेत्र सहाय्यक पाच हजारांची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या बीड शाखेने रविवारी पकडला. सुबराव गुलाबराव मस्के (वय 55 व्यवसाय नौकरी, क्षेत्र सहाय्यक (वर्ग-3) जिल्हा रेशीम कार्यालय बीड असे आरोपीचे नाव आहे. तक्रारदार यांना तुतीच्या पिकाची लागवड करण्यासाठी व सदर पिकाची नोंद ही जिल्हा रेशीम कार्यालय बीड येथे करून घेण्यासाठी तसेच किटक संगोपण गृहाचे अनुदान मिळण्यासाठी 15 हजार रुपयांची लाचेची मागणी करुन तडजोडी अंती 13 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यापैकी पाच हजार रुपये लाच स्विकारतांना दि.11 रोजी केज बस स्थानकात रंगेहाथ लाचलुचपथ विभागाने पकडले. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, औरंगाबाद पोलीस अधीक्षक डॉ.अनिता जमादार, बीड उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक रविंद्र परदेशी, पोनि.राजकुमार पाडवी, पोना.श्रीराम गिराम, पोना.हनुमान गोरे, पोशि मनोज गदळे, चालक पोशि संतोष मोरे यांनी केली.echo adrotate_group(7); echo adrotate_group(10);echo adrotate_group(8);