aaditya-sarda

अपात्रतेच्या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात आदित्य सारडा आव्हान देणार

न्यूज ऑफ द डे बीड

हा आदेश माझ्यावर अन्याय करणारा-सारडा

बीड : राज्याच्या सहकार मंत्र्यांनी बीड जिल्हा बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा यांच्या अपात्रतेचे आदेश कायम ठेवले आहेत. या आदेशाविरोधात आता आदित्य सारडा उच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत, अशी माहिती त्यांनी ‘कार्यारंभ’शी बोलताना दिली.

  आदित्य सारडा म्हणाले, सहकार मंत्र्यांनी दिलेला हा आदेश माझ्यावर अन्याय करणारा आहे. जी रक्कम शेतकर्‍यांच्या प्रोत्साहन अनुदानापोटी प्राप्त झाली होती, ती रक्कम बँकेने संबंधित शाखेमार्फत संबंधित सेवा सोसायट्यांना वर्ग केली होती. वास्तविकत पहता ती रक्कम कर्जाची मुदत संपल्यानंतर प्राप्त झाली असल्यामुळे ती रक्कम सोसायट्यांनी संबंधितांच्या खात्यावर वर्ग केली होती. प्राप्त रक्कम ज्या सभासद शेतकर्‍यांच्या नावे आली होती ती त्यांनाच दिलेली आहे. बँकेचा अध्यक्ष या नात्याने मला धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार आहे. नियमित व्यवहार करायचा अधिकार संबंधित शाखा, त्या शाखेचा व्यवस्थापक आणि संस्थेच्या सचिवांचा असतो. जो ठपका ठेवून माझ्यावर कारवाई झालेली आहे, त्यासंदर्भात जिल्हा बँकेकडे एकाही शेतकर्याने तक्रार केलेली नाही, यामुळे या अन्यायकारक आदेशाच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा यांनी बोलताना दिली.

Tagged