बीड जिल्हा; 121 पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : दि.16: मागील काही दिवसामध्ये कोरोना पॉझिटिव्हचा आकडा शतकाच्या खाली आला होता. मात्र हा आकडा पुन्हा शतकपार होताना दिसत आहे. शुक्रवारी आलेल्या अहवालात 121 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
आरोग्य प्रशासनाला शुक्रवारी 686 अहवाल प्राप्त झाले होते. त्या पैकी 557 रिपोर्ट निगेटिव्ह आले. तर 121 पॉझिटिव्ह आढळले. यामध्ये अंबाजोगाई 15, आष्टी 25, बीड-30, धारुर 18, गेवराई 5, केज 2, माजलगाव 8, परळी 7, पाटोदा 5, शिरुर 9, वडवणी 5 असे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आकडा वाढत असल्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे असे अवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

1
2
3

Tagged