न्यूज ऑफ द डे

शिक्षकांच्या अनुदानाचा मार्ग मोकळा

By Karyarambh Team

October 17, 2020

echo adrotate_group(3);

बीड जिल्ह्यातील शिक्षकांकडून निर्णयाचे स्वागत

प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना अनुदानमुंबई : मान्यताप्राप्त शाळांना 20 टक्के आणि ज्या शाळांना 20 टक्के आहे त्यांना 40 टक्के अनुदान देण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयाचे बीड जिल्ह्यातील अनुदानाच्या प्रतीक्षेतील शिक्षकांकडून स्वागत होत आहे.echo adrotate_group(6);

    मान्यताप्राप्त खाजगी शाळा, प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा यांना 20 टक्के अनुदान देणे हा प्रस्ताव मंत्रिमंडळात नेला होता. त्याला मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील 43 हजार 511 शिक्षकांना याचा फायदा होणार आहे. 345 कोटींचा बजेट यासाठी लागेल त्याला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो शिक्षकांमधून या निणर्याचे स्वागत करण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या अनेक वर्षापासून विना मानधन काम करणार्‍या शिक्षकांच्या कष्टाचे चिज झाले अशा प्रतिक्रिया देखील शिक्षक हितचिंतकांनी व्यक्त केल्या आहेत. तर काही ठिकाणी आनंदोत्सव साजरा करत या निर्णयाचे जोरदार स्वागत केले आहे.echo adrotate_group(8);

मुख्यमंत्र्यांचे मानले आभारया निर्णयाबद्दल बीडसह राज्यभरातील शिक्षकांमधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले जात असून शिक्षकांच्या प्रश्नाकडे ते आणखी लक्ष देतील अशा अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.echo adrotate_group(9); echo adrotate_group(10);