नाथसागरामध्ये आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

पैठण  :  पैठण येथील नाथसागर धरणाच्या पाण्यामध्ये सोमवारी (दि.19) सकाळी अनोळखी 55 ते 60 वर्षीय महिलेचे प्रेत तरंंगताना आढळून आले आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
नाथसागर धरणावर फिरण्यासाठी जाणार्‍या नागरिकांना पाण्यामध्ये महिलेची प्रेत तरंगत असल्याचे आढळून आले. याबाबत पैठण पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे यांनी धरणावर जाऊन महिलेचे प्रेत मच्छीमार युवकाच्या मदतीने पाण्याबाहेर काढले. सदर महिला 55 ते 60 वर्षाची असून अंगावर हिरव्या रंगाची ब्लाऊज आहे. हिरव्या रंगाच्या दोन बांगड्या हातावर नक्षी बोललेला आहे.या महिलेची ओळख पटवण्यासाठी कोणाला काही माहिती असल्यास संबंधित पोलिस ठाण्याला कळवावे असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे यांनी केले आहेत.

Tagged