eknath-khadase

न्यूज ऑफ द डे

Breaking : खडसेंचं अखेर ठरलं! भाजपला रामराम; ‘घड्याळ’ हाती बांधणार

By Karyarambh Team

October 21, 2020

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजपातील जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरु होत्या. अखेर एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम केला असून ‘घड्याळ’ हाती बांधणार असल्याचे वृत्त समोर आलं आहे. शुक्रवारी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे समर्थकांनी सांगितले आहे.

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या समर्थकांनी बॅनरबाजीला सुरुवात केली आहे. ‘भाऊ तुम्ही बांधाल तेच तोरण तुम्ही ठरवाल तेच धोरण’ असा मजकूर टाकून आम्ही सदैव आपल्या सोबत असल्याचे बॅनर झळकल्याने एकनाथराव खडसे यांच्या प्रवेशाबाबतच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. दरम्यान, तीन दशके भाजप वाढविण्यासाठी राज्यात काम करणार्‍या खडसे यांनी अखेर भाजपला रामराम केला असून राष्ट्रवादीत ते प्रवेश करणार आहेत. शुक्रवारी दुपारी 2 वाजता प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.