Site icon कार्यारंभ लाईव्ह

Breaking : खडसेंचं अखेर ठरलं! भाजपला रामराम; ‘घड्याळ’ हाती बांधणार

eknath-khadase

eknath-khadase

echo adrotate_group(3);

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजपातील जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरु होत्या. अखेर एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम केला असून ‘घड्याळ’ हाती बांधणार असल्याचे वृत्त समोर आलं आहे. शुक्रवारी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे समर्थकांनी सांगितले आहे.echo adrotate_group(6);

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या समर्थकांनी बॅनरबाजीला सुरुवात केली आहे. ‘भाऊ तुम्ही बांधाल तेच तोरण तुम्ही ठरवाल तेच धोरण’ असा मजकूर टाकून आम्ही सदैव आपल्या सोबत असल्याचे बॅनर झळकल्याने एकनाथराव खडसे यांच्या प्रवेशाबाबतच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. दरम्यान, तीन दशके भाजप वाढविण्यासाठी राज्यात काम करणार्‍या खडसे यांनी अखेर भाजपला रामराम केला असून राष्ट्रवादीत ते प्रवेश करणार आहेत. शुक्रवारी दुपारी 2 वाजता प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.echo adrotate_group(8); echo adrotate_group(10);echo adrotate_group(9);

Exit mobile version