पंकजाताईंनी जाहीर केला दसरा मेळावा! कसा साजरा होणार मेळावा? स्वरूप जाणून घ्या

बीड

बीड: दरवर्षी भगवान बाबांच्या जन्मस्थानी होणारा दसरा मेळावा यंदाही साजरा करण्याचे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी केले आहे. परंतु कोरोनाच्या महामारीमुळे लोकांच्या जिवाजी काळजी घेऊन यंदाचा मेळाव्याला पंकजाताई भगवान भक्ती गडावरून ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत.


आपल्या कार्यकर्त्यांसाठी पंकजाताई यांनी एक व्हिडिओ जारी केला असून त्यात त्या म्हणतात, यावेळी सर्वांनी भगवान भक्तीगडावर येण्याऐवजी आपापल्या गावात भगवान बाबांच्या प्रतिमेचे सार्वजनिक पूजन करावे. दरवर्षी संख्येचा विक्रम होतो यावर्षी कार्यक्रमाच्या संख्येचा विक्रम आपण करूयात. मी भगवान भक्तीगडावरून तुम्हाला याही वर्षी मार्गदर्शन करणार आहे पण ते ऑनलाईन असणार आहे असे पंकजाताई यांनी स्पष्ट केले. त्यामुळे यंदाचा मेळाव्याला खंड पडणार नाही आणि आपली भक्ती आणि शक्तीची परंपरा देखील कायम राहील असे, पंकजाताई म्हणाल्या.

Tagged