बीड: परिस्थिती अत्यंत वाईट आहे. सोयाबीन पहिल्यांदा उगवले नाही, उगवले तर फळ नाही, पुन्हा पेरले तर पावसाने सगळं निसर्गाने हिरावले. शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका सरकारने घ्यायला हवी, असे मत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी मांडले.त्या बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, अधिकारी पंचनामे करीत नाहीत. पंचनामे केले तरी नुकसानीची तीव्रता कमी दाखवली जाते. हे आम्हाला मान्य नाही. शेतकऱ्यांचे आणि शेतीचे 80 टक्के नुकसान झाले आहे. लॉटरीवर बियाणे दिले जातेय. बँकेकडून वसुलीसाठी तगादा सुरू आहे. विमा ऑफलाईन स्वीकारून त्यांना भरपाई मिळायला हवी. शेतकऱ्यांची दिवाळी सरकारने गोड करावी. असे आवाहन मी सरकारला करीत आहे. यावेळी आमदार लक्ष्मण पवार, गोविंद केंद्रे, भीमराव धोंडे, केशवराव आंधळे, अक्षय मुंदडा, राजेंद्र मस्के, मोहन जगताप, रमेश पोकळे आदींची उपस्थिती होती.
मी घरात का हे कळले असेल!मी इतक्या दिवस घरात का होते ते आता सगळ्यांना कळले असेल. लोक गर्दी करतात. त्यावेळी कोरोनाचा पीक पिरेड होता. त्यामुळे मी जिल्ह्यात आले नाही. तणाव होऊ नये म्हणून मी आता जिल्ह्यात आले. मी परत आलेय. वेळोवेळी आपली भेट होईल.