DEVENDRA FADANVIS

कोरोना अपडेट

देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

By Karyarambh Team

October 24, 2020

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात त्यांनी स्वत: ट्वीट करत माहिती दिली आहे.

माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी, असं देखील फडणवीस यांनी म्हटलं आहे.