SAHEBRAO DESHATWAD

क्राईम

पैठणच्या तत्कालीन नायब तहसीलदाराच्या मुलाची आत्महत्या

By Karyarambh Team

October 25, 2020

echo adrotate_group(3);

20 पानी सुसाईट नोट लिहून पोलीस त्रास देत असल्याचा उल्लेख

पैठण, दि. 22 : शिधापत्रिका घोटाळ्याच्या तपासासाठी पोलीससारखे घरी येऊन त्रास देत असल्याने व प्रेयसी ब्लॅकमेल करीत असल्याने पैठणचे तत्कालिन निलंबीत नायब तहसीलदार नामदेव देशटवाड यांचा मुलगा साहेबराव याने त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी रात्री टीव्ही सेंटर येथे घडली. आत्महत्या केलेल्या साहेबराव याने 20 पानी सुसाईड नोट लिहीली आहे. या घटनेने महसूल प्रशासनात खळबळ उडाली आहे.घटनेची थोडक्यात हकीकत अशी की तहसील विभागात 15 हजार शिधा पत्रिकांचा घोटाळा झाला होता. त्या प्रकरणात तत्कालीन 2 तहसीलदार, दोन लिपिक असे पाच जण आरोपी आहेत. यामुळे देशटवाड हे निलंबित आहेत. त्यासाठी पैठण पोलीस देशटवाड यांच्या औरंगाबाद येथील घरी जाऊन नेहमी त्रास देत असत. 12 सप्टेंबर रोजी पैठण पोलीस ठाण्याचे एक फौजदार, दोन पोलीस यांनी खालच्या स्तरावर शिवीगाळ केल्यामुळे घरातील महिलेचा विनयभंग केल्याची प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवाय प्रेयसीकडून सतत ब्लॅकमेल केले जात होते. तसेच मयत साहेबराव याच्या बँक खात्यातून प्रेयसीने परस्पर पैसे काढून घेतल्याचे सुसाईड नोट मध्ये म्हटले आहे. या सुसाईड नोटमध्ये नमूद केल्यानुसार पैठण येथील तत्कालीन तहसीलदार, प्रेयसी व पैठण पोलीस ठाण्याचे एक फौजदार व पोलीस कर्मचारी यांच्याविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, त्यानंतरच मयत साहेबरावचा अंत्यविधी करण्यात येईल, अशी भूमिका मयताचे वडील व नातेवाईकांनी घेतली आहे.echo adrotate_group(6); echo adrotate_group(1);echo adrotate_group(5);