पदवीधर मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

न्यूज ऑफ द डे बीड

बीड : कोरोनामुळे महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पदविधर मतदार संघ निवडणूक लांबणीवर पडली होती. अखेर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

औरंगाबाद विभाग पदविधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांची मुदत 19 जुलै रोजी संपली, परंतू कोरोनामुळे निवडणुक लांबणीवर पडली होती.
निवडणूक आयोगाचा असा आहे कार्यक्रम
5 ते 12 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार
17 नोव्हेंबर रोजी माघार घेता येणार
1 डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान
3 डिसेंबर रोजी मतमोजणी
‘यांना’ उमेदवारी मिळण्याची शक्यता
राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण हे उमेदवार असतील. त्यांनी गत महिन्यापासूनच मतदारांच्या गाठीभेटी सुरु केल्या आहेत, यावरून उमेदवारी त्यांनाच असल्याचे जवळपास निश्चित होते. तसेच भाजपकडून जयसिंग गायकवाड यांच्यासह अन्य नावांची चर्चा सुरू आहे.

Tagged