क्राईम

पिंपळनेर हद्दीत खून

By Keshav Kadam

November 06, 2020

बीड दि.6 : तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका युवकाचा खून केल्याची घटना शुक्रवारी (दि.6) सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पिंपळनेर पोलिसांनी धाव घेतली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती सपोनि.शरद भुतेकर यांनी दिली.