vidhan parishad

न्यूज ऑफ द डे

बीड जिल्ह्याला मिळणार 12 वा आमदार!

By Karyarambh Team

November 06, 2020

echo adrotate_group(3);

बीड, दि.6 : राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्त करावयाच्या 12 जणांच्या यादीत काँग्रेसकडून बीडच्या माजी खा.रजनीताई पाटील यांचे नाव देण्यात आले आहे. पाटील यांच्या नावावर राज्यपालांनी शिक्कामोर्तब केल्यास बीड जिल्ह्याला 12 वा आमदार मिळणार आहे.राज्यपालांकडून विधान परिषदेत नियुक्त करण्यात येणार्‍या सदस्यांसाठी 12 जणांच्या नावांची यादी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोपवण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेकडून प्रत्येकी चार जणांची शिफारस करण्यात आली आहे. सायंकाळी 6 वाजता अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, परिवहन मंत्री अनिल परब आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. तिन्ही मंत्र्यांनी राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेवर पाठवायच्या उमेदवारांची यादी राज्यपालांकडे सोपवली. त्यानुसार काँग्रेसकडून 1) सचिन सावंत, 2) रजनी पाटील, 3) मुजफ्फर हुसैन, 4) अनिरुद्ध वणगे – कला, राष्ट्रवादी काँग्रेसकडून 1) एकनाथ खडसे, 2) राजू शेट्टी, 3) यशपाल भिंगे – साहित्य, 4) आनंद शिंदे – कला, शिवसेनेकडून 1)उर्मिला मातोंडकर, 2) नितीन बानगुडे पाटील, 3) विजय करंजकर 4) चंद्रकांत रघुवंशी, यांची नावे देण्यात आली आहेत. या 12 जागांसाठी मुख्यमंत्र्यांचं पत्र आणि मंत्रिमंडळ ठराव यासह कायदेशीर बाबी नमूद करुन राज्यपालांना विनंती पत्र दिलं आहे. सगळ्या कायदेशीर बाबींची पूर्तता करुन यादी सोपवली आहे, त्यामुळे राज्यपाल या यादीवर शिक्कामोर्तब करतील, असा विश्वास परब यांनी व्यक्त केला.echo adrotate_group(6);

बीड जिल्ह्याचे आमदार

विधानसभा सदस्य1) धनंजय मुंडे – परळी2) नमिता मुंदडा – केज3) संदीप क्षीरसागर – बीड4) लक्ष्मण पवार – गेवराई5) बाळासाहेब आजबे – आष्टी6) प्रकाश सोळंके – माजलगावecho adrotate_group(5);

विधान परिषद सदस्य1) विनायक मेटे – विधीमंडळ सदस्यातून निवड / भाजप2) सतीश चव्हाण – मराठवाडा पदवीधर मतदारसंघ / राष्ट्रवादी3) विक्रम काळे – मराठवाडा शिक्षक मतदारसंघ / राष्ट्रवादी4) सुरेश धस – बीड-लातूर- उस्मनाबाद स्थानिक स्वराज्य संस्था/ भाजपा5) संजय दौंड – विधीमंडळ सदस्यातून निवड / काँग्रेसecho adrotate_group(9);

संभावित राज्यपाल कोटा1) रजनी पाटील echo adrotate_group(1);