क्राईम

बेपत्ता शिक्षकाचा पालीच्या धरणात मृतदेह आढळला

By Keshav Kadam

November 12, 2020

बीड दि.12  गेवराई येथील बेपत्ता जिल्हा परिषद शिक्षकाचा मृतदेह पाली येथील बिंदुसरा धरणामध्ये गुरुवारी (दि.12) दुपारी आढळून आला. सदरील मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला आहे. बीड तालुक्यातील पाली येथील बिंदुसरा धरणामध्ये एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती बीड ग्रामीण पोलीसांना मिळाली. त्यानुसार त्या ठिकाणी धाव घेत नपच्या बचाव पथकाच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. त्यानंतर सदरील मृतदेह हा रंगनाथ विश्वनाथ शिंदे (वय 45 रा.पांगरी रोड, बीड) यांचा असल्याचे समजले. रंगनाथ शिंदे हे गेवराई येथे जिल्हा परिषद शिक्षक आहेत. ते गेवराई येथून (दि.9) बेपत्ता असल्याची मिसींग गेवराई पोलीसात दाखल होती. बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोनि.संतोष साबळे यांच्या मर्गादशनाखाली पोह.सोनवणे, आनंद मस्के, रविंद्र जाधव, शिंदे, बाबर, डोंगरे यांच्यासह बचाव पथकाने मृतदेह पाण्याच्या बाहेर काढला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.