grampanchayat

ग्रामपंचायतीचा स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम रद्द

न्यूज ऑफ द डे बीड राजकारण

राज्य निवडणूक आयुक्तांची घोषणा
बीड, दि.19 : कोरोनाच्या अनुषंगाने राज्यातील ग्रामपंचायतींचा स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम आज अखेर रद्द करण्यात आला. त्यामुळे आता नव्याने याची अधिसुचना प्रकाशीत होऊन नव्याने हा कार्यक्रम जाहीर होईल, असे राज्य निवडणूक आयुक्त यु.पी.एस. मदान यांनी सांगितले. राज्यातील 1566 ग्रामपंचायतींची निवडणूक होणार होती. तर जिल्ह्यातील 120 ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे. सध्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
निवडणूक आयुक्त मदान म्हणाले, राज्यातील 19 जिल्ह्यांतील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 24 फेब्रुवारी 2020 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते. परंतु कोविडची परिस्थिती उद्भवल्याने 17 मार्च 2020 रोजी उमेदवारी अर्ज छाननीच्या टप्प्यावर हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. तत्पूर्वी 31 जानेवारी 2020 पर्यंत अद्ययावत केलेली विधानसभेच्या मतदार यादीवरून ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतदार याद्या तयार करण्यात आलेल्या होत्या. विधानसभेची ही मतदार यादी 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित होती. परंतु भारत निवडणूक आयोगाने आता 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारित अद्ययावत मतदार यादी 25 सप्टेंबर 2020 रोजी प्रसिद्ध केली आहे.
त्यामुळे नव्याने मतदार यादीत नाव नोंदवलेल्यांना निवडणूक लढवता यावी किंवा मतदान करता यावे म्हणून राज्य निवडणूक आयोगाच्या 5 फेब्रुवारी 2020 च्या आदेशान्वये ग्रामपंचायत निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेली मतदार यादीदेखील रद्द करण्यात आली आहे. परिणामी आता या निवडणुकांसाठी मतदार यादी आणि प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम नव्याने जाहीर केला जाणार आहे.

बीड जिल्ह्यातील या गावात होणार निवडणूक
माजलगाव : दिंद्रुड, चोपानवाडी, नित्रुड, मोगरा, गंगामसला.
वडवणी : सोन्नाखोटा, देवळा.
धारूर : जगीरमोहा, रुईधारूर, भोपा.
बीड : मौज/ब्रह्मगाव, मौजवाडी, वासनवाडी, जिरेवाडी, तिप्पटवाडी, कोळवाडी, पालवण, नागझरी, कडमवाडी, पिंपळगाव घाट, कर्झणी, पिंपळगाव मोची, नागापूर (बुद्रुक), कळसंबर, कारळवाडी, पिंपळगाव मजरा, पोखरी, काटेवाडी, गुंधा, बोलखंडी (पाटोदा), वरवटी, मानेवाडी, भंडारवाडी, बहिरवाडी, वंजारवाडी, आनंदवाडी, वायभटवाडी, गुंढेवाडी, म्हाळसापूर.

शिरूर कासार : हाटकरवाडी, रायमोहा, टाकळवाडी, भनकवाडी, सांगळवाडी, कोथिंबीरवाडी, कोळवाडी, येवलवाडी.
अंबाजोगाई : ढावडी, अंबलवाडी, हनुमंतवाडी, वाकडी, केंद्रेवाडी, दत्तपूर, मार्टी.

आष्टी : धनगरवाडी, कुंटेफळ, कारेगव्हाण, शेरी (बु.), डोईठण, कर्‍हेवाडी, वटाणवाडी, सुंबेवाडी, सोलापूरवाडी, हातोला, पिंपळा.
पाटोदा : काकडहिरा, उखंडा/पिट्टी, खडकवाडी, निरगुडी, दासखेड, पारगाव घुमरा, ढालेवाडी, अनपटवाडी, बेदरवाडी.

गेवराई : टाकळगाव, जवाहरवाडी, पांढरवाडी, तळेवाडी, तलवाडा, कुंभारवाडी, डोईफोडवाडी, चोपण्याचीवाडी, चव्हाणवाडी, मुळूकवाडी, वंजारवाडी, सुर्डी (बु.), गढी, गोविंदवाडी, मादळमोही, खेर्डावाडी, भडंगवाडी, खेर्डा (बुद्रुक), मन्यारवाडी, मानमोडी, बाबूलतारा.

परळी : रेवली, भोपला, लाडझरी, मोहा, गडदेवाडी, सरफराजपूर, वंजारवाडी.

केज : वाघेबाभूळगाव, नारेवाडी, मुंडेवाडी, आंधळेवाडी, गप्पेवाडी/नामेवाडी, भोपला, घाटेवाडी, कोरडेवाडी, पैठण, रामेश्ववाडी, काशीदवाडी, बाणेगाव, येवता, पाथ्रा, जाधवजवळा, मोटेगाव, लाखा, विडा/गौरवाडी, दरडवाडी, धोत्रा, शिंदी, बोबडेवाडी, सुकळी.

Tagged