बीड, दि.21 : शनिवारी प्रशासनास प्राप्त झालेल्या कोरोना अहवालामध्ये 72 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. जिल्हा आरोग्य प्रशासनास 1896 प्राप्त झाले होते. त्यापैकी 1824 अहवाल निगेटिव्ह तर 72 जण पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये अंबाजोगाई -5, बीड-19, गेवराई-3, केज -6, माजलगाव -32, परळी-4, शिरुर-2, वडवणी-2 या तालुक्यांचा समावेश आहे. पाटोदा, आष्टी, धारुर या तालुक्यामध्ये एकही कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही. कोरोनाचा आकाडा सतत कमी जास्त होत असून नागरिकांनी काळजी घ्यावी, नियमांचे पालन करावे असे अवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.