चंद्रकांत अंबिलवादे : दि.२८ : अज्ञात मारेकर्यांनी पती-पत्नी आणि मुलीचा निर्घुणपणे धारदार शस्त्राने हत्या केली. या घटनेने पैठण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान पाटील भूमरे यांनी तातडीने जुने कावसन येथे भेट दिली आहे. पैठण तालुक्यातील जुने कावसन येथे शुक्रवारी (दि.26) मध्यरात्री अज्ञात मारेकर्यांनी राजू उर्फ संभाजी नारायण निवारे (वय ३५), पत्नी अश्विनी राजू उर्फ संभाजी निवारे (वय २८) व मुलगी सायली संभाजी निवारे (वय ८) यांची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. या घटमुळे पैठण पोलीस उपविभागीय अधिकारी गोरख भाबरे, गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे, निरीक्षक किशोर पवार यांनी घटनास्थळ भेट देऊन पाहणी केली. ज्या घरामध्ये ही घटना घडली त्या परिसरामध्ये मारेकर्यांनी पती-पत्नी व मुलीला ठार मारण्यासाठी वापरलेले काही प्राणघातक शास्त्र आढळून आले. या घटनेचा पंचनामा पैठण पोलीस ठाण्याचे सपोनि. गजानन जाधव, उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे, छोटू सिंग गिरासे यांनी करून मयत पती-पत्नी व मुलीचे मृत्यू देह पैठण येथील शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आला. या प्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोशमृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी रुग्णालय परिसरात मोठ्या संख्येने युवक व नातेवाईक जमा झाले. नातेवाईकांनी यावेळी एकच आक्रोश केला.
काही संशयित ताब्यातया प्रकरणी पोलिसांनी काही संशयिताना ताब्यात घेतले आहे. लवकरच आरोपी अटक केले जातील असे पोलिसांनी सांगितले.