अज्ञात वाहनाच्या धडकेत मुलगा ठार, वडील जखमी

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड माजलगाव

 माजलगाव  दि.28 : पाथरी तालुक्यातील मरडसगव येथून दुचाकीवरून जात असलेल्या पिता-पुत्रांच्या गाडीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात मुलगा जागीच ठार झाला तर वडील जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी (दि.28) संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान माजलगाव तेलगाव रोडवर शिंदेवाडी फाट्याजवळ घडली.
पाथरी तालुक्यातील मुंडसगाव येथील रहिवासी हरिभाऊ गीताराम काळे (वय 35 वर्षे) हे दुचाकीवरून वडिल गीताराम काळे (वय 55) यांना घेऊन धारुर तालुक्यातील अंजनडोह येथील नातेवाईकांकडे जात होते. पाठीमागून येत असलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात हरिभाऊ काळे जागीच ठार झाले तर त्यांचे वडील गीताराम काळे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना माजलगावच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी आंबाजोगाई येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

कार्यारंभ आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@karyarambhbeed) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tagged