Site icon कार्यारंभ लाईव्ह

चार घरफोडया उघडकीस आणून आरोपीला ठोकल्या बेड्या!

arrested criminal corona positive

beed police

echo adrotate_group(3);

बीड दि.3 : आष्टी, अंभोरा पोलीस ठाणे हद्दीत चोऱ्या करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले आहे. त्याने साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याची कबुलीही दिली आहे.
मागील दोन ते तीन महिण्यात बीड शहरासह जिल्ह्यात मोठया प्रमाणावर चोरीच्या घटना घडल्या आहेत. यासाठी पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व त्यांचे अधिपत्याखालील अधिकारी यांना कडक सूचना दिल्या होत्या. पोनि.भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. विजय गोसावी व त्यांचे पथक आष्टी भागात गुन्हेगारांचा शोध घेत असताना खात्रीलायक माहिती मिळाली की, कानिफनाथ ऊर्फ कान्हया उध्दव काळ (रा बाकी ता. आष्टी) याने व त्याचे साथीदार यांनी मोजे शरी, सांगवीआष्टी यथील घरफोडया केल्या आहेत. तो सध्या त्याचे राहत्या घराचे पाटीमागे झाडाखाली बसलेला आहे. अशी माहिती मिळालेवरुन पथकाने योग्य सापळा लावून दिनांक 2 नोव्हेंबर 2020 रोजी कानिफनाथ कर्फ कान्हा उध्दव काळे यास ताब्यात घेतले. त्यास गुन्हयाबाबत विचारपुस करता त्याने त्याचे इतर दोन साथीदारांसह शेरी (व), सांगवीआष्टी, धानारा, अंभोरा यथे चोरी केल्याची कबुली दिली. आष्टी, अंभोरा ठाण्यातील चोरीच्या गुन्ह्यात त्यास पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपअधीक्षक संतोष वाळके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.विजय गोसावी व त्यांच्या टीमने केली.echo adrotate_group(7); echo adrotate_group(10);echo adrotate_group(8);

Exit mobile version