न्यूज ऑफ द डे

सतीश चव्हाण यांची पहिल्या फेरी अखेर आघाडी

By Karyarambh Team

December 03, 2020

औरंगाबाद- मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु असून पहिल्या फेरीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात सतीश चव्हाण यांना 17372 मतांची आघाडी मिळाली आहे. भाजपचे बोराळकर यांना 10973 मते मिळाली. सतीश चव्हाण यांना 1073 पोस्टल मतांपैकी 600 पोस्टल मते पडली असून ते पोस्टल मतांत 314 मतांनी आघाडीवर होते.