पैठण : येथील नाथसागर धरणामध्ये पैठण शहरातील रहिवासी असलेल्या वृध्द दाम्पत्याने आजाराला कंटाळून नाथसागरात उडी मारून आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. त्यामुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.सूर्यभान दयाराम राऊत (वय 70) व त्यांची पत्नी कौशल्याबाई राऊत (वय 65) दोघेही रा.काळापहाड पैठण असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे.
नाथसागर धरणामध्ये पुरुष आणि महिलेचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती पैठण पोलीसांना मिळाल्यावरून त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ठाण्याचे उपनिरीक्षक रामकृष्ण साकडे यांनी पंचनामा करून धरणांमधून या दाम्पत्यांचा मृतदेह बाहेर काढत शवविच्छेदनासाठी सरकारी दवाखान्रूात दाखल केला. सूर्यभान राऊत हे गेल्या आणि दिवसापासून आजारी होते. ते कधी पुण्याला तर कधी पैठणला आपल्या घरी राहत होते. त्यामुळेच त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले. याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे हे करीत आहे.