india first vaccine bharat biotech

कोरोना अपडेट

अतिशय धक्कादायक : कोरोनाची लस घेतल्यानंतर हरयाणाचे आरोग्यमंत्री कोरोनाग्रस्त!

By Karyarambh Team

December 05, 2020

नवी दिल्ली : ज्या लशीच्या भरोशावर कोरोनावर नियंत्रण मिळवता येईल असे वाटत होते नेमके त्याच लसीने धोका दिल्याचे उघड झाले. कारण सध्या चाचण्या सुरू असलेल्या आणि लसीचा डोस दिलेल्या व्यक्तीलाच करोना झाल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे लशीचा डोस घेऊनही संक्रमती झालेले व्यक्ती दुसरे तिसरे कोणी नसून हरणाचे आरोग्यमंत्री आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे.हरणाचे आरोग्यमंत्री अनिल वीज यांनीच स्वतः ट्विट करून ही माहिती दिली. त्यांना उपचारासाठी अंबाला येथील छावणीमधील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी करोना चाचणी करून घेण्याचं आवाहनही विज यांनी केलं आहे. मात्र, त्यांना करोनाची लागण झाल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. करोनाची लागण झालेल्या अनिल विज हे भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचणीमध्ये सहभागी झाले होते. महिनाभरापूर्वी कोवॅक्सिन लसीच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचणीसाठी विज यांनी स्वतःचं नाव दिलं होतं. रोहतकमध्ये त्यांनी लसीचा डोस घेतला होता.देशात करोनावर परिणामकारक ठरणार्‍या लसी तयार करण्याच काम सुरू आहे. यामध्ये कोवॅक्सिन लसीचाही समावेश आहे. कोवॅक्सिन ही स्वदेशी लस असून, भारत बायोटेक भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या सहकार्यानं विकसित केली आहे. या लसीच्या चाचण्या सुरू असून, ही लस करोनावर प्रभावी असून, तिसर्‍या टप्प्यातील चाचण्या सुरू असल्याचा दावा भारत बायोटेकने केलेला होता. आता कंपनीकडून अधिक स्पष्टीकरण येईपर्यंत लसीबद्दल संभ्रम निर्माण झालेला आहे.