Site icon कार्यारंभ लाईव्ह

अटकेची मागणी करताच पाचोड पोलीसांनी आरोपी दाखवले अटक

echo adrotate_group(3);

पैठण दि.10 : तालुक्यातील पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये थेरगाव येथे 6 डिसेंबर रोजी एका अल्पवयीन मुलीवर गावातील दोन तरुणांनी बलात्कार केला होता. यातील आरोपींना अटक केली जात नव्हती. त्यानंतर महत्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकार्‍यांनी अटकेची मागणी केली. मागणी करताच पाचोड पोलीसांनी फरार असलेली आरोपी अटक केली.
शेती वस्तीवरील राहणार्‍या एका अल्पवयीन मुलीवर गावातील जुनेद दस्तगीर पठाण व दीपक आहेर या दोन नराधमांनी जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला होता. पीडितेच्या आई-वडीलांनी या प्रकरणी पाचोड पोलीसात तक्रार दिली. गुन्हा दाखल करण्यात आला. पंरतू पाचोड पोलीस कासवगतीने या प्रकरणाचा तपास करत होते. चार दिवस उलटल्यानंतरही आरोपींना अटक केलेली नव्हती. त्यामुळे पीडितेच्या नातेवाइकांनी महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकार्‍यांना या गंभीर प्रकाराची माहिती दिली. झालेल्या घटनेसंदर्भात ना.छगनराव भुजबळ यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना तातडीने या प्रकरणांमध्ये लक्ष घालावे अशी मागणी केली. तसेच याबाबत समता परिषद जिल्हाध्यक्ष मनोज घोडके, दीपक सोनवणे, अमोल तुपे, प्रकाश दिलवाले, नवनाथ वाघमारे, गजानन बाबर, श्रीकांत मुळे, ज्ञानेश्वर अंतरकर, चंद्रकांत होळकर, संदीप घोडके या पदाधिकार्‍यांनी पाचोड पोलिसाला समक्ष भेटून निवेदन देऊन फरार आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी करताच दोन्ही आरोपीला वेगवेगळ्या ठिकाणी अटक केल्याचे दाखविण्यात आले आहे. अटक केलेल्या आरोपीबद्दल माहिती देण्यास तपासअधिकारी मात्र गोपनीयतेच्या नावाखाली टाळाटाळ करीत आहे.echo adrotate_group(6); echo adrotate_group(10);echo adrotate_group(5);

Exit mobile version