beed police

क्राईम

बीड तालुक्यात गांजाची शेती; 63 झाडे जप्त

By Keshav Kadam

December 16, 2020

बीड, दि.16 :बीड तालुक्यातील म्हाळस जवळा परिसरातील तांड्यावर बुधवारी (दि.16) दुपारच्या सुमारास गांजाची झाडे जप्त करण्यात आली. राजाराम दशरथ लांडे (वय 55 रा.बीड ह.मु.म्हाळस जवळा तांडा परिसर) असे आरोपीचे नाव आहे. त्याने याच परिसरातील एका शेतामध्ये गांजाची शेती केली होती. यावेळी गांजाची छोटी छोटी 63 झाडे जप्त करण्यात आली असून त्याचे वजन अंदाजे दोन किलो असल्याची माहिती असून या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक सतिष वाघ, सपोनि.आंनद कांगुणे, सफौ.संजय जायभाये,पोह.बालाजी दराडे, पोह.काळे, राहुल शिंदे, पोना.बागवान, व त्यांच्या टिमने केली.