आष्टी

सहनिबंधकासह महिला लिपीक एसीबीची जाळ्यात

By Keshav Kadam

December 17, 2020

  बीड दि.16 : आसिस्टंट रजिस्टार व महिला लिपीकेस सहा हजार रूपयांची लाच घेतांना गुरुवारी (दि.7) रंगेहाथ पकडले. ही कारवाई बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. आष्टी येथील असिस्टंट रजिस्टार सुधाकर वाघमारे व लिपिक कविता खेडकर असे लाचखोर आरोपींची नावे आहेत. त्यांनी तक्रारदाराकडे संस्थेची नोंदणी करण्यासाठी सात हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या संदर्भात लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने सदरील कार्यालयातच सापळा लावला. यावेळी तक्रारदार यांच्याकडून सहा हजराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई बीडच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील व पोलीस निरीक्षक पाडवी यांनी केली. या कारवाईने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.असिस्टंट रजिस्टारसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात