न्यूज ऑफ द डे

बीड जिल्ह्यातील 481 गावात आचारसंहिता

By Shubham Khade

December 18, 2020

जिल्हाधिकारी : 129 ग्रा.पं.साठी 148 गावात होईल मतदान बीड : जिल्ह्यात 129 ग्रामपचांयतीसाठी 148 गावात मतदान होणार आहे. आता निवडणूक होऊ घातलेल्या 129 गावांसह लगतच्या 481 गावातही आचारसंहिता असणार आहे. जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी शुक्रवारी ही माहिती दिली आहे.

जिल्हाधिकारी रेखावार यांनी 481 गावांची यादी जाहीर केली आहे. निवडणूक होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीपासून काही अंतरावरच लगतच्या ग्रामपंचायतींची हद्द सुरु होते. त्याठिकाणी जाऊन निवडणूक आचारसंहितेचा भंग करू शकतात. आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे, या उद्देशाने निवडणूक होऊ घातलेल्या 129 गावांसह लगतच्या 481 गावातही आचारसंहिता लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी जारी केले आहेत.