क्राईम

पैठण तालुक्यातील विहामांडवा येथे सावकाराला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या….

By Karyarambh Team

December 23, 2020

सूसाईड नोट सापडली…

पैठण– तालुक्यातील पाचोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या विहामांडवा शिवारात येथील बाळासाहेब विठ्ठलराव आवारे ५५ वर्षीय शेतकऱ्यांनी सावकाराला कंटाळून शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रोजी घडली. यावेळी सदर शेतकऱ्याने आपल्या खिशात सूसाईड नोट लिहून ठेवल्याचे आढळून आले आहे. यामध्ये गावातील चार ते पाच व्यक्ती त्रास देत असल्यामुळे आत्महत्या करण्यात येत आहे असे लिहिलेले आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहेसदर घटनेची खबर मिळताच विहामांडवा पोलिस चौकीचे जमादार संजय मदने, पो ना आप्पासाहेब माळी यांनी तातडीने घटनास्थळ जाऊन मयत शेतकऱ्याला विहामांडवा शासकीय रुग्णालयाचे दाखल करण्याचा प्रयत्न केल. परंतु येथील डॉ सोनकांबळे हजर नसल्यामुळे या शेतकऱ्याला बावीस किलोमीटर पाचोड येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे. सदरील शेतकऱ्यांनी आत्महत्या का केली व सूसाईड नोट मध्ये आत्महत्या कारणीभूत असलेल्या चार ते पाच व्यक्तीचे नाव असल्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात नाव कोणाकोणाचे आहे याविषयी चर्चेला उधाण आले आहे.