क्राईम

वैद्यनाथ साखर कारखान्याच्या चोरीत ना.मुंडेंच्या कार्यकर्त्याचा हात

By Karyarambh Team

December 24, 2020

echo adrotate_group(3);

परळी दि.24 : परळी तालुक्यातील वैद्यनाथ साखर कारखान्यात झालेल्या चोरी प्रकरणात राष्ट्रवादीच्या नगरसेविकेच्या पतीचा हात असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. वैद्यनाथ साखर कारखान्यातील स्टोअर गोदाम व वर्कशॉप गोदामातून नुकतेच संगणक संच, मॉनिटर, कॉपर मटेरियल, बिअरिंग, ब्रास मटेरियल, बुश राऊंड असे विविध साहित्य चोरट्यांनी लंपास केले होते, ज्याची किंमत सुमारे 37 लाख 94 हजार 914 इतकी होती. कारखान्याचे लिपीक खदीर शेख यांच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी भादवि 461, 380 कलमान्वये गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली होती. या प्रकरणात काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय होता, त्यावरून पोलिसांनी रमेश उर्फ पिंटू माणिक काळे, सलाऊद्दीन गफार सय्यद, मोशीन गौस काकर (सर्व रा.परळी) व मुतजीन मुनीर शेख रा.लातूर यांना अटक केली. या चोरी प्रकरणी पोलिसांनी अजीज इस्माईल शेख रा. परळी याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. मंगलदादा हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेचा पती आहे. आतापर्यंत त्याच्यावर विविध प्रकरणात गुन्हे दाखल झालेले आहेत. वैद्यनाथ कारखान्यातील चोरीमागे त्याचा हात असल्याने पोलिसांनी त्याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. काल शोध घेताना पोलिसाच्या तावडीतुन तो निसटला पण त्याच्या ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात यश मिळाले आहे. पोलिस मंगलदादाच्या मागावर असून त्याला लवकरच अटक करू असे पोलिसांनी सांगितले.echo adrotate_group(6); echo adrotate_group(1);echo adrotate_group(8);