paithan khun

क्राईम

तिहेरी हत्याकांडातील आरोपी वैजापूर येथून अटक

By Karyarambh Team

January 06, 2021

पती-पत्नीसह चिमुकलीची केली होती हत्या

पैठण दि.6 : शहरालगत असलेल्या गोदावरी नदीच्या काठावर जुने कावसन येथे पती-पत्नीसह चिमुकलीची धारदार शास्त्राने हत्या करण्यात आली होती. यातील संशयित आरोपी ग्रामीण गुन्हा शाखेच्या पथकाने वैजापूर येथे अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. पैठण शहरालगतच्या गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या जुने कावसन येथे २८ नोव्हेंम्बर शनिवारी मध्यरात्री राजु उर्फ संभाजी निवारे, अश्विनी, मुलगी सायली यांचा प्राणघातक शस्त्राने हत्या करण्यात आली होती. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर पैठण पोलीस वेगवेगळ्या पद्धतीने तपास करीत होते. अखेर बुधवारी वैजापूर येथे या घटनेतील संशयित आरोपी ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाने जेरबंद केला. या संशयित आरोपीच्या अटकेबाबत गुरुवारी रोजी सविस्तर माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातून देण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.