बीड

बापरे! तलाठ्याने मागितली होती १ लाखांची लाच; केजमध्ये झाला ‛ट्रॅप’

By Shubham Khade

January 09, 2021

केज तहसीलच्या आवारातच ‛लुटारू’ तलाठ्यासह सहाय्यक पडकला

केज : तब्बल १ लाखांची लाच मागणाऱ्या ‛लुटारू’ तलाठ्यासह सहाय्यकास बीडच्या ‛एसीबी’च्या पथकाने येथील तहसीलच्या आवारातील टाकळी सज्जाच्या (अनधिकृत) कार्यालयाजवळ शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास रंगेहाथ पडकले आहे.

दयानंद शेटे (वय ५०) असे लाचखोर तलाठ्याचे तर सचिन घुले (वय ३१) असे पकडलेल्या सहाय्यकाचे नाव आहे. सहाय्यकाच्या माध्यमातून तक्रारदाराकडून पाझर तलावात संपादित जमिनीसंबधीत क्षेत्र कमी दाखविण्यासाठी तब्बल १ लाख रूपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती सहाय्यकाकडून ५० हजार रुपये स्वीकारताना ‛एसीबी’च्या पथकाने रंगेहाथ पकडले. दोघा लाचखोराविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.