dhananjay-munde

नवा ट्विस्ट; धनंजय मुंडेंवर आरोप करणार्‍या महिलेविरोधात भाजपा नेता पोलीसात

क्राईम न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र राजकारण

मुंबई- मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणार्‍या महिलेविरोधात एका भाजपा नेत्याने पोलीसात धाव घेतली आहे. संबंधीत महिला मला 2010 पासून ब्लॅकमेल करीत असल्याचा आरोप या नेत्याने केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

धनंजय मुंडे यांच्या आरोप करणारी महिला ही गायिका आहेत. त्यांच्या बहीण आणि धनंजय मुंडे हे दोघेही परस्पर सहमतीतून एकमेकांच्या संबंधात होते, असा खुलासा मुंडे यांनी फेसबूक पोस्टद्वारे केला होता. आता भाजपा नेते कृष्णा हेगडे मुंडे यांच्या बचावासाठी पुढे आले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार संबंधीत महिला या ब्लॅकमेलर आहेत. 2010 पासून त्या मलाही ब्लॅकमेल करीत होत्या. आज धनंजय मुंडे त्याचा बळी ठरले आहेत. येथून पुढे कोणीही त्याचा बळी ठरू नयेत, या महिलेने मला 6 व 7 जानेवारी रोजी मेसेज करून ‘आप मुझे भूल गये है क्या?’ असा मेसेजही केला होता. संबंधीत महिला मलाही परस्पर संबंध ठेवण्यासाठी मला भाग पाडत होती. आता मी पोलीस ठाण्यात दाखल करण्यासाठी चाललो असल्याचे हेगडे म्हणाले. आज धनंजय मुंडे याचे बळी ठरले पण मी त्याही आधी मी या महिलेचा बळी ठरलो असतो, असेही हेगडे म्हणाले. माझ्या तक्रारीनंतर अशी अनेक प्रकरणं बाहेर निघतील असाही विश्वास हेगडे यांनी व्यक्त केला.

Tagged