grampanchayat

न्यूज ऑफ द डे

बीड जिल्ह्यात 111 ग्रा.पं.साठी 83.58 टक्के मतदान

By Shubham Khade

January 15, 2021

बीड : जिल्ह्यातील 111 ग्रामपंचायतींसाठी एकूण 83.58 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या ग्रामपंचायत निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.

सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत जिल्ह्यात एकूण 1 लाख 33 हजार 498 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यामध्ये 61 हजार 788 महिला तर 71 हजार 710 पुरुष मतदारांचा समावेश आहे. विभागाच्या माहितीनुसार, सर्वाधिक 87 टक्के मतदान बीड तालुक्यात तर सर्वात कमी 76.40 टक्के मतदान धारूर तालुक्यात झाले आहे. तसेच, अंबाजोगाई 83.95, माजलगाव 79.82, गेवराई 82.41, केज 80.94, आष्टी 86.65, पाटोदा 87.72, वडवणी 83.44, शिरूर कासार 87.87 शिरूर कासार 87.87 तर परळी तालुक्यात 83.64 टक्के मतदान झाले आहे. दरम्यान, आता सोमवारी लागणार्‍या निकालाकडे लक्ष असणार आहे. 129 ग्रामपंचायींना निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यानंतर 18 ग्रामपंचायती बिनविरोध जाहीर झाल्या. त्यामुळे 111 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले.